सातारा – प्रतिनिधी
महिलेला अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती (म.अंनिस) कोरेगाव शाखेच्या पुढाकाराने हुतात्मा स्मारक येथे संगीता चव्हाण या महिलेची जटा कापूनमुक्तता करण्यात आली.
हा उपक्रम म.अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार व राज्य कायदा विभाग सदस्य ॲड. हौसेराव धुमाळ यांच्यामार्गदर्शनाखाली पार पडला. जटामुक्तीची प्रक्रिया सातारा येथील लाजली ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. हर्षाली पोतदार यांनी केली.
यावेळी म.अंनिसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्गे, प्रसारमाध्यम सचिव दशरथ रणदिवे, शहर प्रसारमाध्यम सचिव राजेश पुराणिक, तसेचकार्यकर्ते हेमंत जाधव, सुधाकर बर्गे, जगुबाई फरांदे, मानस पोतदार आदींची उपस्थिती होती.
प्रशांत पोतदार म्हणाले, “शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 12 व्या स्मृतीदिनी ही जटामुक्ती म्हणजे त्यांच्याप्रती अनोखे अभिवादनआहे. त्यांच्या विचारांना कृतिशील रूप देत राहणे, हाच आमचा निर्धार आहे.”
संगीता चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, “गेल्या दहा वर्षांचे ओझे आज हलके झाले. काही जणांनी पूजा न करता जटा कापल्यासधोका होईल, अशी भीती दाखवली. मात्र अंनिस कार्यकर्त्यांच्या समुपदेशनामुळे मी धैर्य दाखवू शकले. आता खरी मुक्तीमिळाल्यासारखे वाटते.”
उपस्थित सर्वांनी “विवेकाचा आवाज बुलंद करूया” या घोषणेने उपक्रमाचा समारोप केला. अंधश्रद्धेविरुद्ध लढा आणि विवेकशीलतेचासंदेश देणारा हा प्रेरणादायी उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरला.












Leave a Reply