कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर शरद पवार हेच …

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई:कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. तसेच कोरोना संकटाच्या काळात निर्यात बंदी म्हणजे कोरोना पेक्षाही मोठे संकट असल्याचे सांगत यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार निश्चितपणे मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल दिली आहे.

कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी नाराजी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली पाच ते सहा महिने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. आज शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदतीची गरज असताना केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा दुर्दैवी आहे. असे मत आ.काळे यांनी व्यक्त केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *