शिवनगर
संभाजी ब्रिगेड पार्टीच्या पुणे जिल्हा पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी पणदरे (ता. बारामती) येथील विनोद जगताप यांची निवड करण्यात आली. जगताप यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत केंद्रीय कार्यकारिणीने त्यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा पश्चिम विभागासाठी निवड करण्यात आल्यावरती आयोजित कार्यक्रमात जगताप म्हणाले, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहे. केंद्रीय कार्यकारिणीने दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून यापुढे सामाजिक बांधिलकी जोपासत काम करणार आहे. ज्या ठिकाणी अन्याय होईल, त्या ठिकाणी आवाज उठवला जाणार असल्याचे ते म्हणाले.












Leave a Reply