आरळे ते खोपोली पायी दिंडी सोहळा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिवथर,  (प्रतिनिधी)-

आरळे (ता. सातारा) येथील स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रमाच्या वतीने दि. ते १७ ऑगस्ट यादरम्यान आरळे ते खोपोली पायीदिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती श्री महंत स्वामी हरीहरानंदगिरी महाराज यांनी दिली.

या दिंडी सोहळ्याचे यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दिंडी सोहळ्याचे प्रस्थान दि. ऑगस्ट रोजी सकाळी .३० वाजता होणार आहे.

हा कार्यक्रम मठाधिपती स्वामी हरीहरानंदगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली होत असून आशिष महाराज (खोपोली आश्रम), बालयोगी गणेशगिरी महाराज (खोपोली आश्रम), शंकर महाराज (श्री क्षेत्र जरंडेश्वर देवस्थान) यांच्या हस्ते पार पडणार आहे. दिंडीसोहळ्याची सुरुवात आरळे येथून होणार आहे तसेच मुक्काम अनुक्रमे दि. रोजी पहिला मुक्काम गौरीशंकर कॉलेज लिंब, दि. रोजीसुरूर हायस्कूल, दि. रोजी अक्षय लॉन्स शिरवळ, दि. १० रोजी शिवराय मंगल कार्यालय खेड शिवापूर, दि. ११ ऑगस्ट रोजी महादेवमंदिर सुतारवाडी, दि. १२ रोजी सुशीला मंगल कार्यालय, तळेगाव फाटा, दि. १३ रोजी शिवशंकर गार्डन कामशेत, दि. १४ रोजी तुकारामपालुका मंदिर वाकसई, दि. १५ रोजी स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे पोहोचणार आणि मुक्काम असणार आहे. सर्वभाविकांनी या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन आरळे येथील स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम, आरळे ग्रामस्थांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *