वडूथ मंडलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर उत्साहात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वडूथ मंडलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर उत्साहात

६९१ जणांनी घेतला लाभ

शिवथर

सातारा तालुक्यातील वडूथ मंडळातील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन महसूलचे नायब तहसिलदार विजयकुमार धायगुडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी एकूण ६९१ जणांनी या शिबीराचा लाभ घेतला.

यावेळी सातारा तहसील कार्यालयातील संजय गांधी पेन्शन विभाग, पुरवठा विभाग, सेतू कार्यालय व महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग यांनी सहभाग घेतला होता. यावेळी डोमासाईल दाखले १३८, उत्पन्नाचे दाखले ७२, रहिवासी दाखले ६७, जातीचे दाखले १९, सातबारा उतारा २५, खाते उतारा १८, फेरफार उतारे, १०, फेरफार अदालती निर्गती ०८, वारस रजिस्टर निर्गती १६, शिधापत्रिका नावे कमी, वाढविणे व दुरुस्ती ८७, सामाजिक अर्थ सहाय्य योजना परिपूर्ण २२, सामाजिक अर्थसहाय्य योजना अर्ज ०७, जन्म-मृत्यू दाखले ५५, अॅग्रीस्टॅक ०७, पिक विमा ०३, आरोग्य विभाग तपासणी ८२ याबरोबरच पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे लसीकरण, लंम्पी रोगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला वडूथ मंडल अधिकारी रुपाली यादव, ग्राम महसूल अधिकारी वडूथ-संतोष पिसे, आरफळ – नितीन फडतरे, मालगाव – प्रविण आदक, आरळे – सुजाता गुंजवटे, शिवथर – विशाल पवार, पाटखळ – मालोजी भोसले, पुरवठा विभाग – अतुल जीवने, संजय गांधी विभाग – श्री.साळुंखे, पोलीस पाटील – माधुरी पोतदार – मालगाव, नीलिमा टोणपे – आरफळ, संदीप माने – वडूथ, तानाजी पाटील – बोरखळ, कल्याणी शिंदे – बसाप्पाचीवाडी, वंदना ननावरे – पाटखळ यांच्यासह मंडलातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, सर्व आपले सरकार केंद्र व महा ई सेवा केंद्र वडूथ, मंडलातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे सचिव, ग्राम विकास अधिकारी व महसूल सेवक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *