दिव्यांग व्यक्तींच्या आधार नोंदणीसाठी कोरगाव भाजपा युवा मोर्चाचे प्रशासनाला साकडे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोरेगांव (प्रतिनिधी) :

कोरेगांव तालुक्यातील असंख्य दिव्यांग व्यक्तींच्या आधार कार्ड नोंदणीसाठी तालुक्यातील कोणत्याही आधार नोंदणी केंद्रात “रेटिना स्कॅनिंग” यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे, “रेटिना स्कॅनिंग” यंत्रणा कोरेगांव मध्ये उपलब्ध करून दिल्यास हा त्रास बंद होईल यासाठी आज कोरेगांव भाजपा युवामोर्चाच्या वतीने कोरेगांव उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले आहे.
भाजपा युवा मोर्चाचे कोरेगाव शहर अध्यक्ष दीपक फाळके यांच्या नेतृत्वाखाली आज हे निवेदन कोरेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “रेटिना स्कॅनिंग” यंत्रणा कोरेगांव येथे उपलब्ध नसल्यामुळे आधार नोंदणीसाठी दिव्यांग व्यक्तींना साताऱ्यात जावे लागत आहे, तो भुर्दंड व नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधार नोंदणीसाठी दिव्यांग व्यक्तींना शारीरिकदृष्टीने होणारा त्रास लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने कोरेगाव येथेच “रेटिना स्कॅनिंग” यंत्रणा उपलब्ध करून द्यावी व सामान्य नागरिकांसह दिव्यांग व्यक्तींना दिलासा द्यावा अशी मागणीही सदर निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह, युवा सेना तालुका प्रमुख धनवान कदम, अजित बर्गे, जिल्हा सरचिटणीस अमोल माने, जिल्हा उपाध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस गणेश भोसले, अमोल बर्गे, अनिकेत घनवट, सुमित देंडे, गौरव खवळे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे सदस्य, तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *