वडूथ मंडलात आज महाराजस्व अभियान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिवथर

वडूथ ता.सातारा महसूल मंडलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सोमवार, ४ ऑगस्ट रोजी शिवशंकर लॉन्स पाटखळ माथा येथे राबविण्यात येणार आहे. तरी वडूथ महसूल मंडलातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी विविध दाखल्यांचे वाटप होणार असल्याची माहिती सातारा तहसिलदार समीर यादव यांनी दिली.

सविस्तर वृत्त असे की, नागरिकांचे महसूल संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात येते.या शिबीरामध्ये विविध योजना राबविण्यात येतात. महाराजस्व अभियानांतर्गत शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र (EWS), नॉन क्रिमिलेअर, शिधापत्रिका वाटप तसेच नाव कमी करणे-वाढविणे, संजय गांधी निराधार योजना, सातबारा, फेरफार यासह महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग या विभागांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे विविध कार्यालयात प्रलंबित असलेले अर्ज, फेरफार, आणि इतर प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जातात. तसेच या योजनांचा एकत्रित लाभ एकाच जागेवर देण्यासाठी अभियानाचे आयोजन करण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *