सातारा
स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमांचे विशेष निमंत्रण परळी येथील नवउद्योजिका सौ. अंजना शंकर कुंभार यांना पोस्ट विभागाच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन
देण्यात आले. जिल्ह्यातून एकमेव अशा या नवउद्योजिका आहेत ज्यांना राष्ट्रपती भवन तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या लाल किल्ल्याहून ध्वजारोहण करणार आहेत अशा कार्यक्रमास त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
परळी तालुका सातारा येथील सौ अंजना शंकर कुंभार यांना उमेद अभियानांतर्गत मार्गदर्शन मिळाले उमेद संस्था ही महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना समूह बचत गटामार्फत आर्थिक मदत करते यातूनच सौ कुंभार यांनी लखपती दीदी या योजनेतून त्यांच्या महिला बचत गटासाठी कर्ज घेतले होते यातून त्यांनी आपला पारंपारिक व्यवसाय वृद्धिगत करत गावातून टप्प्या टप्प्याने राज्यभर पुणे मुंबई पाटण सातारा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कलाकुसर प्रदर्शित केली मातीच्या वस्तू पारंपारिक गणपती मूर्ती मातीची भांडी खेळणी त्यांनी राज्यभर पोहोचवल्या त्यांच्या या कार्याची दखल उमेद संस्थेने घेतली. यातूनच त्यांनी पुढचा पल्ला पार केला. त्यांनी जिल्ह्यातील नवोद्योजकांना प्रेरणा मिळेल अशी उत्तुंग अशी कामगिरी केली या कामगिरीची दखल देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांना 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती सचिवालय न्यू दिल्ली यांचेकडून आलेले विशेष निमंत्रण प्रवर अधीक्षक डाकघर सातारा रत्नाकर टोपारे उपाधीक्षक सातारा डाक विभाग मयुरेश कोले, सहाय्यक अधीक्षक पश्चिम उपविभाग संदीप घोडके डाक अधिकारी परळी यांचे माध्यमातून त्यांच्या राहत्या घरी परळी येथे जाऊन विशेष निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात आली.
सन्माननीय महिला राष्ट्रपतींकडून महिला पोस्टमनच्या माध्यमातून महिला नवउद्योजकास स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभ आमंत्रित करण्यात आल्यामुळे हे महिला सक्षमीकरणाचे एक आदर्श निर्माण झाला आहे.
आनंददायी क्षण
आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती तसेच आदरणीय पंतप्रधान यांच्या उपस्थित होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणे तसेच राष्ट्रपती भवन येथे विशेष आमंत्रित कार्यक्रमास उपस्थित राहणे हा आमच्या जीवनातील सर्वोच्च कर्तुत्वाचा क्षण आहे. सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने उमेद संस्था अभियान यांनी महिला सक्षमा करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यातूनच आम्हालाही संधी मिळाली आहे उमेद अभियानातून आम्हाला मार्गदर्शन आर्थिक सहकार्य राज्यभर स्टॉल उभारण्यासाठी मिळालेली संधी यामुळेच मी या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकले.
सौ.अंजना कुंभार












Leave a Reply