दि.१ ते ७ ऑगस्ट “महसूल सप्ताह” होणार साजरा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा- प्रतिनिधी

महात्मा गांधींनी दिलेल्या “स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार” या मूल्यांचा वारसा जपत दि.१ ते ७ ऑगस्ट कालावधीत सातारा जिल्ह्यात महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा तालुक्यात तहसिलदार समीर यादव यांच्या नेतृत्वाखाली या सप्ताहाचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

या सप्ताहात महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना गौरवण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

शासन निर्णय २०१२ अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडून लाभाची वसुली, शिव व पाणलोट क्षेत्रातील कामांची तपासणी, वादग्रस्त प्रकरणांमध्ये जलद निर्णय, ‘एम-सँड’ धोरणाची अंमलबजावणी असे उपक्रम या सप्ताहात राबवले जातील.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र अभियान अंतर्गत झाडे लावणे, डोंगरी भागात विशेष मदतीच्या योजनांचा लाभ, शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी हे महत्त्वाचे टप्पे या सप्ताहात गाठले जाणार आहेत.

“महसूल विभागाचा हा स्तुत्य उपक्रम नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा आणि शासनाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणारा ठरेल,” असा विश्वास तहसिलदार समीर यादव यांनी व्यक्त केला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *