देशमुखनगर-प्रतिनिधी
सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेल्या वळसे ( सातारा) ग्रामपंचायतीने ‘एक झाड आईसाठी ‘ या स्तुत्य उपक्रमांर्तगत तब्बल १५०० वृक्ष लागवडीचा संकल्प करून एकाच दिवशी ५०० वृक्षलागवड केली. पर्यावरण संवर्धनाची गती वाढवत, वळसे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत वृक्षारोपण उपक्रमाला शनिवार दि.२६ जुलै रोजी पासून या उपक्रमाला सुरुवात झाली.
वळसे गावात सातत्याने लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी करत विविध उपक्रम यशस्वी राबविले जातात. वृक्षलागवड
उपक्रमाची सुरुवात गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार, विस्तार अधिकारी शंतनु राक्षे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी सरपंच मनीषा कदम, उपसरपंच संगीता विभुते, ग्रामपंचायत सदस्य निता कदम, शैला चव्हाण, दिपाली कदम, ग्रामपंचायत अधिकारी प्रियांका चव्हाण, इतर सदस्य , पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात तुळजाभवानी विकास सेवा सोसायटी, तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट, श्री शिवाजी उदय मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आजी-माजी सैनिक, शिक्षक संघटना, महिला बचत गट, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात वृक्षदिंडी काढून वृक्षसंगोपन , संवर्धन यावर घोषणा देत जनजागृती केली. ‘एक झाड आईसाठी’ या भावनिक उपक्रमाने ग्रामस्थांना वृक्षारोपणाशी भावनिक नातं जोडण्यासाठी वातावरण निर्माण केले.












Leave a Reply