सरपंच, उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश, जुलैपासून खात्यात थेट जमा

सातारा – प्रतिनिधी

राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सरपंच आणि उपसरपंचांसाठी मोठी दिलासादायक बातमी! सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन आता जुलै २०२४ पासून दुप्पटीने थेट खात्यात जमा होऊ लागले असल्याचे सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.

२०१७ च्या शासन निर्णयानुसार दिले जाणारे मानधन अद्यापही सुरू असल्याने सरपंच परिषद, पुणे कडून मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री नाम. जयकुमार गोरे यांच्याकडे २०२४ च्या नवीन शासन निर्णयानुसार दुप्पट मानधन आणि सदस्य भत्ता मिळावा, अशी जोरदार मागणी केली होती.या मागणीची तत्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अंमलबजावणी सुरू केली असून जुलै महिन्यापासून राज्यभर सरपंच, उपसरपंचांना वाढीव मानधन मिळू लागले आहे.

उदगीर येथे पार पडलेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरपंच परिषदेकडून करण्यात आलेली दुप्पट मानधनाची मागणी मान्य केली होती. त्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करून शासन निर्णय घेतला होता.

आज त्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरपंच परिषदेच्या प्रयत्नांमुळे गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींना न्याय मिळाल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत असल्याचे कार्याध्यक्ष माऊली वायाळ यांनी सांगितले.

चौकट –

*ना.जयकुमार गोरे यांचा करणार जाहीर सत्कार*

या निर्णयाबद्दल सरपंच परिषदेकडून नाम. जयकुमार गोरे यांचा राज्यातील सरपंच एकत्र येऊन ऐतिहासिक साताऱ्यात जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे सरपंच परिषद पुणेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले आणि महिला प्रदेशाध्यक्षा झीनत सय्यद यांनी दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *