कोरेगाव / प्रतिनिधी
शिबिराचे संयोजक अमोल माने भाजपा जिल्हा सरचिटणीस दीपक फाळके भाजपा शहराध्यक्ष .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रतिमेला साजेसाअसा रक्तदानाचा सेवाभावी उपक्रम असंख्य रक्तदात्यांच्या सहभागाने कोरेगावात यशस्वी झाला आहे. नजीकच्या काळात आरोग्यसंवर्धनाचे वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आरोग्यदायी बनवणार आहे, असे प्रतिपादन भाजपच्या राज्यकार्यकारिणी सदस्या डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांनी केले.
महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे महाराष्ट्र नायक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनतापक्षाच्यावतीने कोरेगावच्या शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता भव्य महा रक्तदान शिबीरआयोजित करण्यात आले होते. त्याच्या प्रारंभी त्या बोलत होत्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, न जिल्हानियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथमनगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्कर कदम, माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, शिवसेनेचेतालुकाप्रमुख संजय काटकर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख धनवान कदम, भाजपचे शहराध्यक्ष दीपक फाळके, भाजपचे उपाध्यक्ष शुभममाने यांच्यासह भाजपच्या विविध प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होणार असून त्या माध्यमातून लाखो रुग्णांना दिलासा मिळणारआहे. त्यांना वेळेत रक्त उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तालुक्यातील अनेकांनी विशेष करून महिलांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
या वेळी जवानसिंग घोरपडे, ल्हासुर्णे येथील माजी सरपंच प्रशांत संकपाळ, दीपक कांबळे, प्रशांत पवार, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, प्रीतम शहा, अजित बर्गे, सागर निकम, श्रीकांत बर्गे, दीपक कांबळे, रशीद शेख, श्रेयस काणे, अमोल बर्गे, गौरव खवळे, सुमित देंडे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख उज्ज्वला बर्गे, महिला मोर्चा पदाधिकारी नलिनी बर्गे, उज्ज्वला बर्गे, पल्लवी शिंदे, श्यामलशिंदे, शक्ति केंद्र प्रमुख बुथप्रमुख, आजी माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध गावचे प्रमुखपदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
–












Leave a Reply