शिवथर
आरळे ता. सातारा येथील परमपूज्य स्वामी गगनगिरीनाथ महाराज योगाश्रम येथे भव्य असा गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवारी मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला.
गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी ६ वा. अभिषेक तसेच काकडआरती करण्यात आली. ८ वा. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पादुकांचे पाद्यपूजन व आरती १०:३० वा. होमहवन १२:३० वा. महाआरती आणि एक वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप सुरू झाले. या दिवशी अडीच ते तीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.१९८९ पासून श्री स्वामी गगनगिरी नाथ महाराज आश्रम आरळे येथे सुरुवातीला झाला आहे. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प.पू.स्वामी गगनगिरी नाथ महाराज आश्रम ट्रस्ट आरळे व ग्रामस्थांनी योग्य नियोजन केले होते.












Leave a Reply