साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा

साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेचा उद्देश हाताने मेहतर काम करणाऱ्या, मानवी विष्टांचे वहन करणाऱ्या, व्यक्ती किंवा बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती, अस्वच्छ व्यवसायाशी संबंध परंपरेने असलेले सफाईगार, कातडी कमावणारे आणि कातडी सोलणारे, कचरा गोळा करणे व उचलणे या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देणे हा असून या योजनेसाठी सर्व जाती धर्माचे विद्यार्थी पात्र आहेत. ही शिष्यवृत्ती पहिली ते दहावी पर्यंत किंवा प्रीमॅट्रीक स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांला देय राहील. ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवक व सरपंच तसेच नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी या प्राधिकाऱ्यांनीचे अस्वच्छ व्यवसाय करीत असलेबाबत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

पहिली ते दुसरी पर्यंत दर महा रुपये २२५ रुपये वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा दर आहे. इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंत वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २२५ तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ७०० रुपये इतका शिष्यवृत्तीचा दर आहे. वार्षिंक तदर्थ अनुदान हे वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५० रुपये तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना १००० रुपये इतके आहे.

या योजनेसाठी सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित कायमस्वरुपी विना विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजनेकरीता शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज करणेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यात येऊन सन २०२४-२५ वर्षाकरीताचे अर्ज prematric.mahait.org>Login महा आयटी या पोर्टलवर पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत असे आवाहन जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावर यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *