सातारा
मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार राज्यामध्ये योजनेअंतर्गत रुग्णालयात वाढ होणार आहे. सातारा जिल्हयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच एकत्रित आयुष्मान भारत योजनेंतर्गत ५२ रुग्णालय आहेत. एकत्रित योजनेअंतर्गत १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया, उपचार मोफत आहेत. गरजु गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळण्याकरिता जास्तीत जास्त रुग्णालय अंतर्गत समाविष्ट करण्याचे उदिदष्ट आहे. सातारा जिल्हयाकरिता शासकीय व खाजगी रुग्णालय मिळून १७१ इतके उदिदष्ट देण्यात आले आहे. तरी सद्यस्थितीत फक्त ३७ अर्ज प्राप्त आहेत. तरी ते वाढविण्याची गरज आहे. सातारा जिल्हयामधून योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अर्ज अंगीकरणासाठी चे प्रस्ताव पाठविण्यासाठी जिल्हयातील खाजगी ३० पेक्षा जास्त बेड असणारी मल्टी स्पेशालिटी साठी रुग्णालय व १० पेक्षा जास्त बेड सिंगल स्पेशालिटी साठी योजनेच्या www.jeevandayee.gov.in संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन empanelment request मध्ये ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी केले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्हा रुग्णालय सातारा यांनी केले आहे.












Leave a Reply