सातारा-लोणंद मार्गावरील खड्डे भरण्यास प्रारंभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिवथर

साताराकेडगाव (९६५ डी) मार्गावरील सातारा ते लोणंद येथील मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना मनस्तापसहन करावा लागत होता. मागील दोन दिवसांपासून खड्डे या महामार्ग प्रशासनाने भरण्यास  सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनधारकसमाधान व्यक्त करत आहेत.

       या मार्गावरील वाढे फाटा ते लोणंद हा मार्ग खड्डेमय झाला होता. त्यामुळे वाहन चालक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावालागत होता. तसेच याच रस्त्यावर खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला होता. तर काहींना जायबंदीव्हावे लागले आहे. मागील दोन दिवसांपासून पाऊसही गायब झाल्यामुळे तसेच उशीरा का होईना परंतु रस्ते प्रशासनाने दखल घेऊनदेखभालीचे रखडलेले काम सुरु झाले आहे. महामार्गावरील दयनीय अवस्था जिल्ह्यातील सर्व दैनिक आणि विविध चॅनेल्स यांनीदाखवली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.

या मार्गाच्या स्थितीबाबत विधानमंडळात  प्रश्न उपस्थित केले गेले, तसेच  बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीविस्तृतपणे  मार्गाबाबतची वस्तुस्थिती सांगितली.

यामुळे या मार्गाची सद्यस्थिती भागातील सर्व नागरिकांना समजली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *