माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा वडूथ गावावर अन्याय का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा जिल्ह्याची पार्श्वभूमी
बघितली तर सातारा जिल्ह्यात जास्तीत जास्त धरणे असलेला प्रमुख जिल्हा म्हणजे सातारा जिल्ह्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर कोयना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हे फार मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणारे धरण आहे .ज्या वेळी धरणे बांधण्याचे काम सुरू झालं त्यावेळेस अनेकांची गावं ची गावं पाण्याखाली गेली काही गावं स्थलांतरित झाली त्यांच पुनर्वसन झालं त्यांची मंदिर आणि ज्या काय आठवणी त्या सर्व पाण्यात गेल्या हे सर्व असताना सुद्धा ज्या गावानां पुनर्वसनाच्या जागा दिल्या गेल्या त्यातलेच वडूथ या गावांमध्ये पुनर्वसित आसगाव आले तेव्हा त्याला पण वडूथ गावाने ६० ते ७० एकर जागा दिली त्याचबरोबर भारत फोर्ज कंपनीसाठी जागा तसेच रेल्वे कॅनॉलसाठी अशा असंख्य योजनांसाठी वडूथ गावची जमीन गेली सौर ऊर्जेचा मुख्यमंत्री प्रकल्प महत्वकांशी प्रोजेक्ट हा येणाऱ्या पिढीसाठी चांगला आहे पण तो प्रोजेक्ट करताना ते दुष्काळी भाग आहे जिथे काही पिकत नाही अशा जमिनीवर हा सौर ऊर्जा प्रोजेक्ट उभारावा वडूथ हद्दीत शेजारी असलेले जागृत देवस्थान श्री जरंडेश्वर असलेले देवस्थान पर्यावरणाच्या समतोल चांगल्या प्रकारे राखला जातो
पण या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय .

वडुथ गावातील गाई जनावर असतील त्यांनी चार महिने पावसाळ्यात गोठ्यात चारा घालणे वैरण मिळणे अशक्य आहे त्यामुळे गायरान हे महत्त्वाचे राखीव राहणे हे गरजेच आहे आणि जे गायराण राखीव राहत आहे ते गायरान गावच्या फायद्यासाठी आहे.
गायरान जमिनीचा गावाला एकमेव आधार असल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत मत मांडले. प्रकल्पासाठी जमीन दिली तर भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा व गावकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जमीन देण्याला विरोध

जमीन सौर ऊर्जेसाठी गेली तर गावातील बेरोजगारी वाढली जाईल दुग्ध व्यवसाय कमी होईल त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी गावावर अन्याय करू नये तसेच या प्रकल्पासाठी संपूर्ण गावाने ग्रामसभा घेऊन विरुद्ध दर्शवलेला आहे तरीसुद्धा सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने या प्रकल्पाबाबत पत्र पाठवून सूचना केलेली आहे की या प्रकल्पाला गावाने विरोध करू नये परंतु ग्रामसभेमध्येच या प्रकल्पाला गावाने विरोध केलेला आहे याबाबत गांभीर्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गावातील जनतेला न्याय द्यावा अशी ही विनंती सर्वसामान्य जनता करत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्या गायराणा मध्ये ग्रामपंचायत वतीने वृक्षारोपण केलेले होते ते वृक्षारोपण या सौर ऊर्जा प्रोजेक्टच्या ने झाडे उपसून काढली

सौर प्रोजेक्ट आहेत ते दुष्काळी भागामध्ये होणणे गरजेचे आहे जेणेकरून त्या जागेचा वापर हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि ज्या काही ग्रीन झोन आहेत तिथे असले प्रोजेक्ट करणे चुकीचे आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आणि यामध्ये कुठलाही रोजगार नाही

जर ग्रामसभेच्या ठरावाला जर किंमत नसेल तर त्या गावातील जी काही लोकसंख्या असेल याचा अर्थ की गावातील जनतेचा विचार या शासनाला किंवा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे असे दिसत आहे.

वडूथ गावची एवढीच विनंती आहे की सदरील प्रोजेक्ट हा दुष्काळी भागामध्ये करावा आणि या जागेमध्ये वृक्षारोपण सक्तीचे करावे अशी विनंती ग्रामस्थ करीत आहेत.

विद्युत महामंडळाच्या प्रकल्पाला वडूथ गावाने पूर्णतः विरोध दर्शवलेला आहे शासनाने जनभावनेचा आदर करून प्रकल्पाला जमीन देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी बैठकीत केली. याबाबत दोन वेळा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा घेऊन गावाच्या गायरानामध्ये प्रकल्प होऊ नये असा ठराव करून माननीय जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना पाठवलेला आहे तरी याबाबत मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन या ठिकाणी हा प्रोजेक्ट करू नये अशी विनंती करीत आहे

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

शासनाने ग्रामस्थांचा विरोध डावलून जमिनीवर ताबा घेतला, तर त्यासाठी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *