सातारा सज्जनगड रस्त्यावर वृक्ष कोसळला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा सज्जनगड रस्त्यावर वृक्ष कोसळला

सातारा : दि. ७

सततच्या पावसामुळे सातारा सज्जनगड रस्त्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास भला मोठा वृक्ष कोसळला आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पावसाची संततधार सुरु असल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली असून, दल दल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हलक्या स्वरुपात वारा सुटला तरी मोठ मोठी झाडे उन्मळून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सातारा-सज्जनगड रस्ता हा सतत वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरती सज्जनगड, ठोसेघर, उरमोडी धरण केळवली, सांडवली, भांबवली, पवनचक्क्या यासारखे पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, धबधबा पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येतात. यामुळे हा मार्ग कायम गर्दीने गजबजलेला असतो.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या स्वरुपात जुनाट झाडे आहेत. या भागातून शहरात कामावर जाणारे, बाजारला खरेदी विक्रीसाठी जाणारे लोक, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, असे धोकादायक वृक्ष वाटेत अचानक कोसळल्यास कोणताही मोठा अपघात घडू शकतो. रात्री घडलेल्या घटनेत कोणतेही अपघात घडला नसला, तरी यापुढे असा प्रसंग घडू नये, म्हणून मोठं मोठ्या वृक्षांची फांदी छाटणी करून अपघातही टाळता येतील आणि झाडही वाचवता येतील असे उपाय करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *