रेल्वेमूळे होणार शेतकऱ्यांचे नुकसान …
वडूथ
पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील वडूथ ता. सातारा येथील जरंडेश्वर रेल्वे स्थानक येथून वडूथ ते सातारा रोड पाडळी या मुख्यमार्गाकडे जाणारा रस्ता नव्यानेच करण्यात आला असून या रस्त्यावरून रेल्वे वसाहतीमधील रहिवासी, कामगार, रेल्वे स्टेशनला ये-जा करणारे प्रवासी तसेच वडूथ गावातील शेतकरी शेती करण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. परंतु या मार्गाचे काम निकृष्ट झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गाचा मुख्य रस्त्याला मिळणारा भाग हा योग्यप्रकारे वाहतुकीस तयार करण्यात यावा अशी मागणी बोरखळ व वडूथ येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी शेतकरी म्हणाले, दरवर्षी वडूथ व बोरखळ क्षेत्रातील ऊस पिकाची वाहतूक या मार्गावरून केली जाते. परंतु मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या मार्गावरती तीव्र उतार असल्यामुळे तसेच पूर्वेच्या बाजूला भराव टाकून रस्ता करण्यात यावा. जेणेकरून ट्रॅक्टर किंवा ट्रॉली, अथवा ट्रक, बैलगाडी उलटणार नाही आणि शेतकऱ्यांचे आणि वाहनधारकाचे नुकसान होणार नाही. हे काम चांगल्या पध्दतीने झाले तर पुढील अपघातांना आळा बसेल या पद्धतीने रेल्वे प्रशासनाने हे मार्ग बनवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.












Leave a Reply