म्हसवड परिसरातील वाळू तस्करीला ब्रेक कधी? महसूल मंत्री आणि गृहमंत्री लक्ष घालणार? आटपाडी, सांगली माळशिरस कडे वाळू जाते कशी आशीर्वाद कोणाचे!….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा: माण तालुक्यातील माणगंगा नदी पात्रातील वाळू तस्करी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे या नदी पत्रातील वाळू आटपाडी व सांगली  परिसरात अनधिकृत रित्या वाहतूकीच्या माध्यमातून नेहली जाते या वाळू तस्करीला अभय नक्की कोणाचं आहे या बाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत परंतु स्थानिक प्रशासन या बाबतीत कारवाई का? करत नाही ,हा प्रश्न निर्माण होतो आहे  म्हसवड परिसरातून अवैद्य केलेली वाळूची वाहतूक पुढे मायणी विटा वडूज पोलिसांनी पकडून अनेक वेळा कारवाई केलेली आहे.आज नदी पात्रात परवानगी शिवाय मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी केली जाते या तस्करीला स्थानिक प्रशासन का? रोखू शकत नाही अशी तालुक्यातील जनतेत कुजबुज सुरू आहे.

या बाबत महसूल मंत्री यांच्या बरोबर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या बाबत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे सांगितले

राज्याच्या ग्रहविभागा मध्ये संपर्क साधला असता त्यांनी सांगितले लवकरच गुन्हे शाखेचे एक टीम या परिसरात गस्त घालण्यासाठी आम्ही तयार करत आहोत त्या मुळे या परिसरातील वारंवार येणाऱ्या तक्रारी व वाळू तस्करी ला कायमचा चाप बसेल तसेच जनतेने वाळू ची वाहतूक करताना कोणी निदर्शनास आला तरी त्याची माहिती द्यावी असे ग्रहविभागा मार्फत सांगण्यात आले आहे. त्या मुळे माण तालुक्यातील वाळू तस्करीला अभय कोण देते यांची चौकशी वरिष्ठ पातळीवर झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी हीच येथील जनतेची आग्रहाची मागणी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *