हल्लेखोरांनी आम्हाला विचारून हल्ला केलेला नाही, संजय राऊत संतापले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाईव्ह महाराष्ट्र 24 । मुंबई ।

आम्ही कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचं समर्थन करत नाही. निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला याचं आम्हाला दु:ख आहे. पण आदर हा दोन्हीकडून व्हावा. राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदरच ठेवला पाहिजे, असं सांगतानाच  हल्लेखोरांनी आम्हाला विचारून हल्ला केला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रिपद हे संविधानिक पद आहे. याची जाणीव सर्वांनाच असायला हवी. त्यामुळे या पदाचा आदर ठेला पाहिजे. आदर हा दोन्हीकडून असायला हवा. तुम्हीही काहीही करणार आणि लोक गप्प बसणार असं कधी होत नाही. संविधानिक पदावरील व्यक्तीबद्दल बोलल्यास लोकांना राग येणारच. त्यात सरकारचा दोष काय?, असा सवाल करतानाच एवढा मोठा महाराष्ट्र आहे. १२ कोटी लोक राहतात. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांनी आम्हाला विचारून हल्ला केला नाही. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. माझ्याही बाबतीत होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणाले. नवी दिल्लीत ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला राऊत यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही कोणत्याही मारहाणीचं समर्थन करत नाही. पण तुम्ही वातावरण बिघडवू नका, असं सांगतानाच त्यांच्या मागे कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे, असं राऊत म्हणाले. त्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांना पकडलं असून त्यांना कोर्टासमोर उभं केलं, असं सांगतानाच राज्याची कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *