दिवस-रात्र एक करुन मराठा आरक्षण दिले, मात्र ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही असे आज देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मी व्यथित आहे (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi Government). मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करु, अशी प्रतिक्रिया भाजप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर एका निवेदनातून देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi Government).
“मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेल्या कालखंडात या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या गेले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार प्रारंभीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हते आणि आज त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे”, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
“आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस-रात्र एक करुन परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करुन ते टिकविता आले नसते, हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करुन ते आरक्षण टिकविले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो आहोत













Leave a Reply