विद्युतमहामंडळाकडून ग्राहकांची लूट
(लाईट बिले कोरी दिल्याने विद्युत ग्राहकाकडून संताप व्यक्त)
सातारा .(शिवथर) सातारा तालुक्यामध्ये विद्युत महामंडळाचा मनमानी कारभार चालला असून मोठ्या प्रमाणात लाईट बिलाचीआकारणी करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वी लाईट बिलाचे आकारणी कमी प्रमाणात होत होतीत्यामुळे सर्वसामान्य जनतेला लाईट बिल कमी येत होते त्यावेळी लाईट बिला वरील रीडिंग दाखवले जात होते परंतु आता ग्राहकांनाकोरी बिले देऊनच लुटमार केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडून विद्युत महामंडळाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातआहे. सर्वसामान्य जनतेबाबत राजकीय पुढार्यांना याचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.
शिवथर परिसरामध्ये या महिन्याची घरगुती लाईट बिले कोरी आली असल्याचे दिसून आले त्यामध्ये पूर्णतः पूर्वीच्या लाईटबिला प्रमाणे लाईट बिलाबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे याबाबत राजकीय नेते मंडळी यांनाकाही देणे घेणे नसल्याचे दिसून आले सर्वसामान्य जनतेला वेटीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरवर्षीपेक्षा याही वर्षी महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. यावर्षी मे महिन्यामध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांची शेती पावसामुळे पडून राहिली आहे त्यामध्येच या महिन्यामध्ये राज्य विद्युत महामंडळाने अजब कारभार चालू केला आहेभरमसाठ लाईट बिले देऊन सर्वसामान्य जनतेची लूटमार केली जात असल्याचे दिसून येत आहे कोरी लाईट बिले देऊन ग्राहकांच्याडोळ्यात धुळ टाकण्याचे काम केलेल आहे याबाबत कोणीच काही का बोलू शकत नाही असाही सवाल सर्वसामान्य जनतेमधून केलाजात आहे. या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये चौपट लाईट बिल येत आहेत यात जनतेचा काय दोष विद्युत महामंडळ मनमानीकारभार का करतय या विद्युत महामंडळाला कोणी वाली नाही का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्य विद्युत महामंडळ सर्वसामान्य जनतेची गळचेपी करतय याबाबत राजकीय नेते मंडळी पुढाकार घेणार का तसेचनिवडणुकीपुरती आश्वासने देण्याचे काम होतंय का असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून केला जात आहे याबाबत योग्य ती कार्यवाहीहोऊन जनतेला न्याय देण्याचे काम व्हावे अशीच मापक अपेक्षा आहे












Leave a Reply