शिवथर ग्रामपंचायतीला ग्रामसेवक देता का ग्रामसेव…..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिवथर ग्रामपंचायतीला ग्रामसेवक देता का ग्रामसेवक

 

शिवथर ता. येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक नसल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत तसेच मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे ग्रामसेवक हजर नसल्याने मिळत नाहीत याबाबत ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्रामसेवकाची मागणी सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना केले असता त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे तसेच त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही याबाबतही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत
शिवथर ग्रामपंचायत मध्ये पूर्वीचे ग्रामसेवक वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांच्या जागेवर तात्पुरता चार्ज म्हणून ग्रामविकास अधिकारी बनकर यांना नियुक्त केले होते परंतु त्यांची देखील तालुका बाह्य बदली झाल्याने शिवथर गावाला ग्रामसेवकातून असल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे याबाबत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून फोनच उचलला जात नाही त्यामुळे शिवथर ग्रामपंचायतला ग्रामसेवक देता का अशी मागणी जोर धरू लागले आहे
जनतेचे सेवक असणारे ज्यांच्या अधिपत्याखाली सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत चालवले जातात त्याच अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही असंच सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावर कारवाई का करू नये असाही सवाल उपस्थित होत आहे.

चौकट.
दोन महिने शिवथर ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवकामुळे थांबला आहे यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपामध्ये ग्रामसेवक दिला होता परंतु त्यांच्याकडूनही ग्रामपंचायत मध्ये वेळेत न आल्यामुळे सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट होत आहे त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा.
दत्तात्रय साबळे ( उपसरपंच ग्रामपंचायत शिवथर.)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *