सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी
सातारा

सातारा ते लोणंद व पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया या महामार्गावर आरळे वाढे, वडूथ शिवथर गावालगत गती नियंत्रण ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे पट्टे आहेत. या पट्ट्यावरुन वाहनांची मोठी वर्दळ असून रस्त्यालगत असलेल्या इमारतींना भूकंपा सारखे कंपन होते. त्यामूळे इमारतीचे भिंतीना तडे पडू लागले आहेत. पांढरे पट्टे काढून सोलर रेड लाइट लावण्याची मागणी केली होती .याबाबत लेखी तक्रार राष्ट्रीय महामार्ग पुणे यांच्याकडे करून भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव मदन साबळे यांनी दिली होती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांनी याकडे लक्ष दिले

या गावातून जाणाऱ्या राजमार्गावर काही ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असून तीव्र उतार, धोकादायक वळणे, शाळा असून त्या ठिकाणी लाल रंगांचे सोलर दिवे हे गती नियंत्रणासाठी लावावेत. वडूथ येथील अरूदं पुलाचे संरक्षक बॅरिगेट लावावेत, अशी मागणी केली आहे.

वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी या रस्त्याचे काम करून घेऊ, असा निश्चय केला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांनायश मिळाले, असल्याची माहिती मदन साबळे यांनी दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *