शिवथर मध्ये कायमस्वरूपी अधिकारी मिळावा या साठी मा. जिल्हाधिकारी सो व मा. भुमी अधीक्षक सो यांना . जिल्हा अध्यक्ष–शेतकरी संघटना संदीप साबळे यांनी निवेदन दिले.
भूमी अभिलेख खात्याच्या शिवथर सजा मध्ये शिवथर, मालगाव, लिंब, गोवे, आरफळ, वडूथ, आरळे, पाटखळ अशी अनेक गावे येतअसून त्या गावातील लोक सिटी सर्वे ऑफिस मध्ये नकाशा उतारा यासाठी येत असतात. या ऑफिसच्या माध्यमातून शेकडो शेतकरीआपला काम धंदा सोडून येत असतात परंतु आपणाकडून आठवड्यातून एकच दिवस अधिकारी येत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांनात्याचा नाहक त्रास होत आहे. तरी अधिकारी आठवड्यातून कमीत कमी चार दिवस येणे अपेक्षित आहे परंतु, आपणाकडून एकच दिवसअधिकारी पाठवला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कागदपत्र मिळत नाहीत.
आपणास विनंती आहे शिवथर सजाला आठवड्यातून चार दिवस अधिकारी मिळावा तरी आम्ही सर्वजण आपणास विनंती करीत आहे आमच्या विनंतीला मान न दिल्यास तसेच आठवड्यातून शिवथर सजाला चार दिवस अधिकारी गेला नाही तर आपल्या कार्यालया समोर आंदोलन केले जाईल.
संदीप विष्णू साबळे.
जिल्हा अध्यक्ष–शेतकरी संघटना












Leave a Reply