अखेर बस थांबा झाला प्राथमिक आरोग्य केंद्र वडूथ येथे एसटी बस थांब्याला मान्यता

अखेर बस थांबा झाला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा

वडूथ परिसरातील नागरिकांसाठी सुविधा सुसज्ज असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हा आधार केंद्र बनले आहे. मात्र येथे एसटी थांबानसल्याने रुग्णांची गैरसोय होत असे . अखेर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी महामंडळाला वास्तव आणिथांबा होण्याची गरज निदर्शनास आणणारे निवेदन दिले.महामंडळाचे अधिकारी रोहन पलंगे यांनी दखल घेऊन अखेर महामंडळाच्याविभागीय नियंत्रकानी प्राथमिक आरोग्य केंद्र वडूथ येथे एसटी बस थांब्याला मान्यता देत या परिसरातील ये जा करणाऱ्या एसटी चालकवाहकांना तसे आदेश दिले.

सातारा रोड , भक्तवडी,भाडळे, किन्हई परिसरातील रुग्णांसाठी वडूथ येथील सुविधायुक्त असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र वरदान ठरतआहे. मात्र या ठिकाणी एसटी थांबा नसल्याने रुग्णांना नाहक त्रास होत असल्याचे अनेकांनी लोकप्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारीयांच्या निदर्शनास आणून दिले तरीही दखल घेतली जात नव्हती. याबाबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी निवेदनदेऊन सातत्याने पाठपुरावा केला.

यावर विभागीय नियंत्रकांनी वास्तव परिस्थिती समजून घेऊन सदरची मागणी रास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दि.२० जूनपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, वडूथ हा एसटी गाड्यांसाठी संगणक प्रणालीवर थांबा घेऊन तशा चालक वाहकांना आदेश आणि सुचनादिल्या.

या थांब्यासाठी मदन साबळे यांचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले परिसरातून समाधान व्यक्त केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *