

सातारा ते लोणंद रस्त्यावरील वाढेफाटा ते शिवथर या गावच्या हद्दीत खूप अपघाताचे प्रमाण सध्या वाढलेले त्याला मूळ कारण यामार्गावरील असणारी जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर टोल वाचवण्यासाठी या रस्त्याचा वापर करत असतात पण मुळातच हा रस्ताअरुंद असल्यामुळे या रस्त्यावर जिल्हा प्रशासनाने या रस्त्यावरील जड वाहतूक त्वरित बंद करावी ती वळवून लोणंद मार्गे नॅशनलहायवे राष्ट्रीय महामार्गावरून सातारकडे करावी अन्यथा आम्ही रास्ता रोको करून सर्व वाहतूक बंद करू असा इशारा वडुथ परिसरातीलगावातील ग्रामस्थांनी केला
काल सातारा लोणंद रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा हा वाढे फाटा ते वासोळे या अंतरात वसुलीसाठी दाखल होता दिवसभरात कालआम्ही नागरिकांशी चर्चा केल्यावर समजले की पोलिसांनी सकाळपासून सर्वांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला होता त्यामध्येप्रत्येक वाहनांना ते अडवून प्रत्येकाचे फोटो काढून पावत्या दंड वसूली सुरू होती हा भाग ग्रामीण असल्या मुळे माणसांना त्या परिस्थिथीमध्ये राणात जावे लागते त्यामुळे कुठली कागद पत्रे सारखे बाळगणे येत नाही आणि त्यात हा फौजफाटा
पण या मूळे वडूथ गावातील प्रज्वल आनिल साबळे यांच्या घाबरल्यामुळे त्याचा एक्सीडेंट झालाप्रज्वल आनिल साबळे हा आई वडीलांना एकूलता एक होता आणि घरची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे या कुटुंबावर फारमोठा अनर्थ घडला आहे या कुटुंबाचे खळगी कोण भरणार याला जबाबदार कोण जिल्हा प्रशासन की पोलीस प्रशासन माझं एवढंचआव्हान आहे की सामान्य नागरिकांनी अशा घटना जर घडत असतील वर आवाज उठवा कुठल्याही हिटलरशाही खाली आपण जगतनाही आपण या संविधानाच्या मार्फत या देशाच्या कायद्याचे पालन करून त्याच्यावर आवाज उठवू शकतो आणि पोलीस प्रशासनालाएवढीच कळकळीची विनंती आहे की आपल्याला जर पगार कमी पडत असेल तर जनसामान्याकडून आपण हप्ता बांधून घ्यावा असेहीवाहनचालकांमधून बोलले जात आहे कर्तव्यात कसूर करत असाल तर आम्ही सर्व जनता गप्प बसणार नाही आणि याची दखल खुद्दपालकमंत्री शंभूराज देसाई व एस पी समीर शेख यांनी घ्यावी असेही जनतेमधून बोलले जात आहे.
पोलीस प्रशासनाच्या भीतीमुळे सामान्य नागरिकांना फार मनस्ताप होत आहे त्यामुळे अशा गोष्टी घडत आहेत यापुढे जर सातारा लोणंदरसत्यावर जर कुठलाही पोलीस कर्मचारी किंवा आरटीओ कोणी असं जर थांबले तर आम्ही त्याला वाचा फोडल्या शिवाय शांत बसणारनाही एवढे जर पैसे कमी पडत असतील तर आम्ही स्वतः आमच्या जवळचे पैसे आम्ही या पोलिसांना देऊ आणि त्यांच्या ज्या गरजाआहेत त्या भागवू पोलीस कधीही वाहतूक नियंत्रणा साठी कधी थांबलेले नसतात. यांचा एकच नियम आहे की गाडी आडवा आणि पैसेकमवा
वेण्णा व कृष्णा नदीवरील अरूदं पुल दुरवस्था झालेली आहे . वेण्णा व कृष्णा नदीवर असलेले हे पूल सुमारे १७५ वर्षापूर्वीचाऐतिहासीक दगडी पूल आहेत . त्यावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे . तसेच या पुलावरील वारंवार रस्त्यावर मोठ मोठेखड्डे पडलेले आसतात
परिणामी या पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे . याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम उत्तम केले जावे . अन्यथा याठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . या पुलाची अजून दुरवस्था होऊ नये म्हणून , यापुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी . अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावरुन अवजड वाहतूक तुर्तास बंद करण्यात यावी . यापूर्वीही वडूथ ग्रामस्थांकडून अनेक वेळा निवेदन दिली आहेत . सदर निवेदनाची योग्य ती दखल घेऊन ऊस कारखाने चालू आहेत तोपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात यावी . यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यास प्रशासन व शासन सर्वस्वी जबाबदार राहील . तरी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी उदयनराजे मित्र समूहाचे वडुथ गावचे अध्यक्ष मदन साबळे यांनी केले आहे











Leave a Reply