आमदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिली समज
सातारा -प्रतिनिधी
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे वडूथ- आसगाव येथील रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साठते.सतत अपघात होत असून तत्काळ येथील अडचणी दूर करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लक्ष देण्यास सांगितले. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन अधिकाऱ्यांनी देत नुसता रेल रोको आंदोलनचा इशारा वडूथ,आसगावकरांनी live Maharashtra24 माध्यमातून दिला आणि आमदारांची समज देतात, प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात यश येणार आहे.
गेली तीन महिन्यांपासून जरंडेश्वर रेल्वे स्टेशन जवळ वडूथ ,आसगाव रस्त्यावर नव्याने पुलाचे बांधकाम सुरू आहे.या पुलाचे बांधकाम करणाऱ्या अभियंत्याने आणि ठेकेदाराने घाईघाईत काम करताना अनेक चुका केल्या, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्याच पावसात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यात पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साठते, मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.यामुळे दुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेक जण घसरून पडतात.याबद्दल रेल्वे प्रशासनाला कळवले, भेटायला गेलेल्या स्थानिकांचे ऐकून हि घेतले जात नाही.यामुळे चिडलेल्या स्थानिक नागरिकांकडून अचानक रेल रोको आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती.
याबाबत आमदार महेश शिंदे यांना काही कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलनाची माहिती दिली.यावर आमदारांनी थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न,त्याची गंभीरता, ठेकेदार आणि अभियंता सिंग यांच्या असहकार्य बाबत तक्रार करून लवकर कामाच्या ठिकाणीच्या समस्या सोडविण्यासाठी सुचना देण्यासाठी सांगितले.वरिष्ठांनी ही तत्काळ दखल घेत असून काम करु , अशी ग्वाही दिली.
जिथे चुकीचे तिथे संरपंच किशोर शिंदे व मदन साबळे राहतात उभे
वडूथ परिसरातील कोणताही प्रश्न, अडचण आली की स्थानिक नागरिकांकडून संरपंच किशोर शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्याशी संपर्क केला जातो. खासदार छ.उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मदन साबळे हे अभियंता असून वडूथ,आरळे पुलाचे काम, मुख्य रस्त्याचे काम सुरू असताना पुर्णवेळ लक्ष ठेवून होते. सातारा रोड ते वडूथ रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पाॅटवर बोलवून काम बंद पाडले. रेल्वेच्या पुलाच्या कामामुळे अनेक त्रास होत असताना अधिकाऱ्यांना याविरोधात रेल्वे प्रशासनाला भेटून माहिती दिली.तरीही दखल घेतली न गेल्याने रोको आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी तयारी केली. अनेकांची यासाठी साथ मिळत असताना आमदारांना ही याबाबत त्यांनी कळवले. आंदोलना च्या इशाऱ्याआधीच आमदार महेश शिंदे यांनी दिलेली समज उपयुक्त ठरली.












Leave a Reply