वडजल विकास सेवा सोसायटी च्या अनियमितता बाबत दहिवडी येथे निबंधक कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करणार…
दहिवडी:- वार्ताहर : वडजल विकास सेवा सोसायटी ची निवडणूक गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप काही सभासदानी केला होता त्या नुसार संस्थेची माहिती मिळण्यासाठी सभासदानी सहाययक निबंधक कार्यालयात अर्ज केला होता परंतु सभासदांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली गेली संस्थची माहिती सभासदाची मागणी असल्यास देणे बंधनकारक असताना या संस्थेची माहिती सभासदाना दिली जात नाही जाणीवपूर्वक माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे
जर सहकार विभागाने आम्हाला माहिती दिली नाही किंवा माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली तर सहययक निबंधक संस्था दहिवडी यांचे कार्यालया समोर दिनांक १८/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वा पासून आमरण उपोषण करणार असून प्रशासनाला कोणताही त्रास आमच्या उपोषणा मुळे होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ.अशी माहिती वंचित बहुजन आघाडी चे युवा अध्यक्ष सनी तुपे,स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष युवराज दादा मगर पाटील व भाजप युवा मोर्चा माण तालुका प्रताप काटकर यांनी दिली निवेदनावर मा.सरपंच तुळशीराम काटकर गणेश काटकर,सुभाष काटकर,अप्पासो काटकर,चंद्रकांत काटकर,इत्यादी च्या साह्य आहेत.या संस्थेत मोठया प्रमाणावर अनियमितता झाली आहे स्वतः संस्थेचे तत्कालीन चेअरमन व माण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दीपक काटकर यांनी या संस्थेच्या कारभारावर वेळच्यावेळी आक्षेप घेतला होता स्वतः साहायक निबंधक कार्यालयात माहिती साठी अर्ज केला असून त्याना ही या बाबत योग्य ती माहिती दिली जात नाही म्हणूनआम्हाला माहिती दिली नाही माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली तर सहययक निबंधक संस्था दहिवडी यांचे कार्यालया समोर दिनांक १८/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वा पासून आमरण उपोषण करणार असल्याचे सभासदानी सांगितले.













Leave a Reply