वडजल ता माण परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी? रोखणार कोण? JCB चा वापर वाळू भरण्यासाठी प्रशासन लक्ष देणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वडजल परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी रोखणार कोण?

दहिवडी: (प्रतिनिधी) वडजल परिसरात वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर होत असून रात्रीस खेळ चाले असे वाळू चोरीचा ही वाळू चोरी रोखणे प्रशासनावर जिकारीचे झाले असून जेसीबीच्या सह्यायाने ही वाळू चोरी केली जात असून प्रशासन येई पर्यन्त वाळू चोर चोरी करून पसार झालेले असतात ही वाळू चोरी अशीच सुरू राहिली तर इथे पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही या बाबत महसूल प्रशासनाने वडजल बस स्थानक परिसरात रात्री उशिरापर्यंत गस्त घातल्या शिवाय ही वाळू चोरी रोखणे शक्य होणार आहे. महसूल प्रशासनाने वाळू चोरी झालेल्या ठिकाणचे पंचनामे तत्काळ करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे या बाबत दोन दिवसात उपविभागीय अधिकारी माण व जिल्हाधिकारी सातारा याना निवेदन देण्यात येणार आहे राज्यात वाळूउपसा करण्यासाठी बंदी असताना माण तालुक्यात वडजल परिसरात वाळू उपसा कसा होतो वाळू उपसा करणारे इतके धाडस का करत आहेत हे मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे प्रशासन वाळू चोरी नक्की रोखण्यासाठी पुढाकार घेईल अशी आशा जनतेला आहे अन्यथा जनता पुढाकार घेईल असे मत इथल्या जनतेने व्यक्त केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *