छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे पत्रकार व जनतेस आमंत्रण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे  पत्रकार जनतेस आमंत्रण

नमस्कार! ह्या २४ तारखेला एक मोठी घोषणा करायचे मनात आहे. राजकीय आरोपप्रतिआरोपांच्या ह्या वातावरणात पहिल्याचवाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील त्यामधले काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे तेव्हा हे आमंत्रणपण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही. आपण सारेच आपल्या भोवती सुरूअसणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्यातर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षेप्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणूनस्वतःच एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे. कोणता प्रश्न, काय व्यवस्था.. अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणांस सदरपत्राने आमंत्रण देत आहोत.

२४ फेब्रुवारी सायंकाळी :०० वाजता स्थळगांधी मैदान, राजधानी सातारा. छत्रपती श्रीमंत उदयनराजेभोसले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *