प्रविण राजे /दहिवडी प्रतिनिधी दि. 15
बंजारा लमानी समाजाचे संत सेवालाल महाराज यांची 283 वि जयंती बंजारा लमानी समाजाच्या वतीने दहिवडी नगरपंचायत येथे साजरी करण्यात आली त्याच बरोबर संध्याकाळी प्रबोधन पर चर्चेचेही खुळे वस्ती दहिवडी येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ बोलत होते.
संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी, त्यागी, दूरदृष्टी, बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचे महान संत होते. समस्त बंजारा समाजासह बहुजन समाजाला त्यांनी जगण्याचा नवा मार्ग दाखवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य त्यांनी केले.
मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता, पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांनी निजामाविरुद्ध लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणेसाठी आग्रही भूमिका घेतली. संत सेवालाल महाराजांचे विचार त्याकाळी जितके श्रेष्ठ व परिस्थितीला साजेसे होते तितकेच ते आजही आहेत. भविष्यकाळाकडे पाहण्याची व भविष्याचा अचूक वेध घेणारी त्यांची दृष्टी होती.संत सेवालाल महाराज यांचे विचार क्रांतिकारी व वास्तववादी आहेत. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कुप्रथा, व्यसनाधीनता, भूतदया, निसर्गप्रेम, सत्य, अहिंसा याविषयीचे उपदेश हे वचन, दोहे, कवणे व भजने या माध्यमातून बंजारा बोलीभाषेत समाजासमोर ठेवले आणि समाजात सामाजिक बदल घडवून आणले.
मात्र निजमाविरुद्धचा त्यांचा संघर्ष हा जाणीवपूर्वक जाती आणि धर्म द्वेषा च्या दृष्टीने मांडला जातो. असे दिसत असले तरी बंजारा लमानी समाजाने त्यातील खोड ओळखून हे समजून घेतले पाहिजे की सेवालाल महाराजांनी समाजाच्या मागासले पानावर प्रहार करीत तिला जर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला असेल तर तर्क हे सांगतो की समाज प्रवाहाच्या बाहेर होता म्ह्णून त्याला प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा लागला तर समाजाला प्रवाहा बाहेर ज्यांनी ठेवले ते खऱ्या अर्थांनी समाजाचे वैरी होते. फक्त राजकीय दृष्टीने त्या समकालीन व्यवस्थे वर ज्या निजामाचा पगडा होता , तो वैरी म्हणून दाखवून जे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक व धार्मिक व्यवस्थे वर अधिराज्य गाजवत होते त्यांचं पाप लपवता येणार नाही . त्यासाठी वेळीच इतिहासात होणाऱ्या या खोडसाळ फेरबदलाच भान राखून बंजारा लमानी समाजानं सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या वंचित इतर समाजा बरोबर सलोखा वाढवून मुख्य प्रवाहात राहण्याचे काम करून खऱ्या अर्थाने सेवालाल महाराजांचे अनुयायी बनून दाखवले पाहिजे. असे इम्तियाज नदाफ म्हणाले.
यावेळी वंचित बहूजन आघाडी चे शहर अध्यक्ष पोपट खरात, प्रशिक फौंडेशन चे नंदकुमार शिंदे, संदीप खरात, सचिन गोरड, पत्रकार प्रवीण राजे, वंचित चे महादेव राठोड तसेच बंजारा लमानी समाजाचे कॉन्ट्रॅकटर गणेश पवार, मिथुन पवार, व इतर समाज बांधव उपस्थित होते.












Leave a Reply