उड्डाणपूलांच्या दुर्लक्षीत जागेत फुलणार बगिचे
#सातारा शहरातील वाढेफाटा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक या सातारा शहराच्या प्रवेशद्वारात दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य होते. या उड्डाणपूलांखाली पुण्याच्या धर्तीवर, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, व्हर्टीकल गार्डन, भाजी मंडई, पार्किंग, आर्टिफिशियल वॉटरफॉल, फाउंटन्स्, सार्वजनिक स्वच्छतागृह आदी लोकोपयोगी सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचा निर्धार सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार #श्री_छ_उदयनराजे_भोसले यांनी व्यक्त केला.
सातारा शहराच्या हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांच्या नियोजनाबाबतीत आज खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.
‘इनोव्हेटिव्ह सातारा’ विषयी जलमंदिर पॅलेस येथे बोलावलेल्या बैठकीत उपस्थित अधिकारी आणि कार्यकर्ते यांना सूचना देताना उदयनराजे यांनी सांगितले. अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट आणि वाढे फाटा चौक येथील उड्डाण पुलांखाली मोठी जागा उपलब्ध आहे. या जागेत कोणतेही अवैध उद्योग होवू नयेत आणि जागेचा सुयोग्य वापर लोकोपयोगी कामांकरिता होण्यासाठी आम्हीं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास यापूर्वी काही प्रस्ताव दिले आहेत. या पूलांखालील जागा आम्ही हस्तांतरणास तयार आहोत, निधीची उपलब्धता करवून घेवून विविध उपक्रम सुरु करण्यास महामार्ग प्राधिकरणाची हरकत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंडई-पोलिस चौकी- वाहनतळ आदी
आता सदरचा भाग नगरपरिषदेच्या हद्दीत आला आहे. याकामी उपयुक्त वैविध्यपूर्ण कामांचे प्रस्ताव तयार करुन, विविध उपक्रम सदर जागेच्या खाली सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी कोणते उपक्रम अधिक चांगले ठरतील यासाठी सातारा जिल्ह्यातील आर्किटेक्ट असोसिएशन यांच्याकडून प्रकल्प चित्र तयार करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी भाजी मंडई, पोलिस चौकी, वाहनतळ, सार्वजनिक स्वच्छतागृह, आदी लोकोपयोगी सुविधा नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी आपापल्या विभागातील अधिका-यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत, असेही श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
Chhatrapati Udayanraje Bhonsle
SangramBarge , Kaka dhumal
Innovative SATARA












Leave a Reply