सातारा जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद गटा प्रमाणे कुकुडवाड जिल्हा परिषद गटाला मुख्य प्रवाहात अन्यासाठी ही निवडणूक लढवणार: युवराज मगर पाटील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद गटा प्रमाणे कुकुडवाड जिल्हा परिषद गटाला मुख्य प्रवाहात अन्यासाठी ही निवडणूक लढवणार: युवराज मगर पाटील

दहिवडी: सातारा जिल्हा हा समृद्ध जिल्हा म्हणून जगभर ओळखला जातो पण या जिल्ह्यातील कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचा विकास पाहता सर्वात भकास गट म्हणून राजकीय जाणकार उल्लेख करत आहेत हे चित्र बदलण्यासाठी जनतेच्या आग्रहाखातर मी पुन्हा कुकुडवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे.या भागाला नेहमी दुय्यम दर्जा देण्याचे पाप काही राजकीय समृद्ध नेत्यांनी केले आहे आज या परिसरात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर येऊन कायापालट केला पण राज्यकर्त्यांनी या भागाला न्याय दिला नाही म्हणूनच इथला गरीब हलाकीचे जीवन जगत आहे आज या परिसरातील युवक शिक्षित असूनही मातीकाम करण्यासाठी वसई सारख्या दुर्गम प्रदेशात जात आहे तिथे आपले जीवन जगत आहे या परिस्थिती कडे जनतेने गंभीर होऊन विचार करून बदल घडवला पाहिजे आजच्या परिस्थितीत कुकुडवाड जिल्हा परिषद गटात परिवर्तन करण्यासाठी जनता स्वतःहून एक पाऊल पुढे येत आहे हे या गटाचे वैशिष्ट्य मानावे लागेल
कुकुडवाड जिल्हा परिषद गटा  अंतर्गत डोगरी प्रदेशात राहणारे काही भाग मोडतात आज या वाड्या वस्त्यावर पक्का रास्ता झालेला नाही स्थानिक स्वराज संस्थे मधून जी कामे करायची आहेत ती होऊ शकली नाहीत त्याचा परिणाम आज इथली जनता भोगत आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे अशी या भागातील जनतेची अपेक्षा आहे म्हणूनच या भागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे प्रतिपादन युवराज मगर पाटील यांनी केले आहे
कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची निवडणूक या भागातील जनता हातात घेत आहे हेच निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे असेही मगर पाटील म्हणाले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *