*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्याकडून असंतोष व्यक्त*
लाईव्ह महाराष्ट्र 24 । सातारा । विशेष प्रतिनिधी ।
सातारा जिल्ह्यातील कित्येक गावांतील पथदिव्यांची बत्ती गुल करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या शासननिर्णयानुसार कार्यवाही सुरु झाल्याने जनतेमध्ये या कार्यवाहीविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष असून, लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्षघालून संबंधित विषयावर तोडगा काढावा, अशी मागणी सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळवडूथचे अध्यक्ष मदन साबळे यानी केलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांची जोडणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने खंडित केली आहे. त्यामुळे अनेकगावांमधील पथदिवे बंद आहेत. पावसाळी दिवसात यामुळे अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या अंधाराचा मोठाफटका आधीच कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना बसत आहे. ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. ग्रामीण भागातीलपथदिव्यांचा वीज पुरवठा पूर्वीसारखा सुरू करण्याबाबत उच्चस्तरावरुन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला सूचित करावे व ग्रामीणभागातील अंधकार दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरणकडून प्रत्येक ग्रामपंचायतमधील असणाऱ्या पथदिवांचे बिल न भरले गेल्याने अशा बहुतांश ग्रामपंचायतीच्या पथदिवांची वीजजोडणी खंडित केली गेली आहे. २३ जून २०२१ च्या ग्रामविकास विभागाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येकग्रामपंचायतींनी आपापल्या १५ वा वित्त आयोगातील असणाऱ्या रकमेतून पथदिवांचे थकीत बिल भरावे, असे सूचित करण्यात आलेआहे, त्यानुसार महावितरणने ग्रामपंचायतींना बिले भरण्यास सांगितले. परंतु, ग्रामपंचायतींनी नकार दिल्याने पथदिवांचा वीज पुरवठाखंडीत करण्यात आला आहे. कोरोना सारख्या रोगाशी प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामकृती दल तथा प्रत्येक नागरिक आपल्या जीवाची पर्वा नकरता अहोरात्र झगडतोय, पण अचानक ग्राम विकास विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महावितरणकडून गावातीलपथदीपांची बत्ती गुल होते काय, यामुळे गावागावांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने लक्ष द्यावे
कोरोना बाधित मोठ्या प्रमाणात गावोगावी मिळताहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेतच, त्यामध्ये आता महावितरणकडून केलेल्याकारवाईमुळे ठेचा खात, वाट शोधत ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी वैद्यकीय उपचार करायला जावे लागत आहे. जनतेच्या या सर्व होणाऱ्यागैरसोयी बद्दल लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने या विषयात लक्ष देऊन गावागावांतील पथदीप तात्काळ कसे सुरु होतील, या साठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. जनतेच्या जीवनात आदीच कोरोनासारख्या महामारीमुळे अंधार पसरला आहे. निदान रस्त्यावरचादिवा पेठवून रोजच्या जीवनात प्रकाश पडावा. नाहीतरी सरकार अंधारात काम करते आहे. अशा अनागोंदी कारभार असलेल्या सरकारचाजाहीर निषेध.
मदन भिमाजी साबळे,
सामाजिक कार्यकर्ते वडूथ सातारा
अतिशय तोकडा निधी; ग्रा. पं. चा बिल भरण्यास नकार
मुळात १५ वित्त आयोगातील असणारी रक्कम कश्या प्रकारे वितरित करायची, यातच मोठया प्रमाणात संभ्रम असतानाच पथदिवांचेथकीत बिल १५ वित्त आयोगामधून भरा, असे सांगितल्याने प्रत्येक ग्रामपंचायतींनी बिल भरण्यास नकार दिला आहे, तसेच प्रत्येकग्रामपंचायतीला अतिशय तोकडा निधी प्राप्त होतो आणि त्यामधूनच जर पथदिवांची थकीत देणी भागावायची झाली तर गावचा विकासकरायचा कसा ,असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत.












Leave a Reply