मा.खा.श्री उदयनराजे चे व आमदार महेश शिंदे चे विश्वासू सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सततचा पाठपुराव्याने रस्त्याचे काम फत्ते

सातारा जिल्हा प्रतिनिधी ,संदीप पवार ,

सातारासातारा ते लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी या मार्गावर आरफळ फाटा येथे जरंडेश्वर ढाब्याजवळ कि.मी.३६/८००अंतरावर पाईपलाईन चर काढला होता. त्यामुळे त्याठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून रस्ता खचत चालला होता.

काही दिवसापूर्वीच या राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.रस्ता खचत चालला आहे याबाबतवडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हि बाब निदर्शनास आणून दिली. याविषयी सतत पाठपुरावा केला. आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेतली. ज्या ठिकाणी रस्ताखचत चालला होता त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.आणि, खराब झालेला रस्ता पुन्हा चांगला केला.यामुळे वाहनधारकांनी चालकांनी समाधान व्यक्त केले. नाहीतर याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असते.

याबद्दल सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

पत्रकार संदीप पवार ,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *