सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा UPSC च्या परिक्षेत डंका, देशात पहिला !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा प्रतिनिधी: धनंजय माने-पाटील

           कराडच्या चारुदत्त साळुंखे यांनी UPSC-IES परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. चारुदत्त साळुंखे यांची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चीतच प्रेरणादायी आहे.

चारूदत्त मूळचे चाफळ (ता. पाटण जि. सातारा) रहिवासी आहेत. त्यांचे  प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून पूर्ण करुन इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला 94.55 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. चारुदत्त साळुंखे  हे खाजगी संस्थेत क्लर्क असणार्‍या मध्यमवर्गीय मोहनराव साळुंखे आणि प्राथमिक शिक्षक असणार्‍या संगिता साळुंखे यांचा मुलगा आहे.
दहावीनंतर SGM कॉलेज कराड येथून 92.33 टक्क्यांसह विज्ञान शाखेतून बारावी पुर्ण केली, बारावी विज्ञान शाखेतूनच MHT-CET  परीक्षेत 184 गुण मिळवून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.
टेक्नीकल क्षेत्राला दिशा देणार्‍या भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी निवड झाली. सबंध देशातील या क्षेत्रातील तज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात, तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखती मधून चारुदत्त साळुंखे  संशोधक म्हणून निवड होऊन यशस्वी झाले. त्यानंतर UPSC-IES मुख्य परीक्षादेखील चारुदत्त पास झाले.   त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल चारुदत्त साळुंखे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *