वडजल गावात मोबाईल रेंज नाही,जिओ चा टॉवर असून नसल्या सारखा प्रशासन लक्ष देणार काय?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

दहिवडी प्रतिनिधी(दि.१५ )
वडजल ता माण हे गाव सातारा जिल्ह्यातील अति पूर्वेकडील गाव असून राज्यातील महत्वाच्या शहरांना जाण्यासाठी या गावातून जावे लागते नेहमीच्या रहदारी असणाऱ्या गावात मोबाईल ला रेंज येत नसल्याने अनेकांच्या गैरसोयी होत आहेत आज केंद्रसरकर डिजिटल इंडियाचा नारा देत आहे परंतु राज्यातील प्रगत गावात मोबाईल ला रेंज येत नाही या बाबत प्रशासन लक्ष देणार आहे की नाही असा सवाल गणेश काटकर यांनी उपस्थित केला वडजल हे कुकुडवाड जिल्ह्या परिषद क्षेत्रातील गाव असून मुळात कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा विकासापासून वंचित राहिलेला आहे या भागातील लोकांना रेशन घेण्यासाठी सुद्धा आज ऑनलाइन रजिस्ट्रेशन मशीन वर करावे लागत आहेत, गॅसची बिले भरण्यासाठी सरकार पैसाचा कॅश ने वापर करू नका म्हणून सांगत आहे जर गावात रेंज येत नसेल तर डिजिटल पेमेंट कुठून करणार आज शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत अश्या वेळी विद्यार्थी कसे शिक्षण घेणार राज्यसरकार ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल करण्यासाठी योजना आखत आहे जर गावात रेंज नसेल तर गाव कसे डिजिटल होणार म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन गावात उभा असणारा जिओ चा टॉवर पूर्ण क्षमतेने सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा देणे काळाची गरज आहे असे मत गणेश काटकर यांनी व्यक्त केले
कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा अतिशय दुर्गम आणि अविकसित असणारा भाग ओळखला जाऊ लागला आहे गेल्या काही दिवसात गावात रस्ता नाही म्हणून लोकांनी निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला होता राज्यसरकार ने या विभागाकडे लक्ष दिले पाहिजे असे मत काटकर यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 शी बोलताना व्यक्त केले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *