म्हसवड पोलीस स्ठेशनचा कोरोणायोद्धा हजर होताच कामगीरी खास

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण खटाव प्रतिनिधी:-धनंजय माने-पाटील

        म्हसवड पोलीस स्टेशन मधील कर्तव्यदक्ष ट्राफिक अंमलदार संतोष बागल हे काही दिवसापूर्वी कोरणा ग्रस्त झालेले होते त्यानंतर 29 ऑक्टोबर ला हजर झाल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच पोलीस ‌स्टेशनचे कर्मचारी अधिकारी तसेच म्हसवड मधील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठं जंगी स्वागत करून पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर लगेच आपलं कर्तव्य पार पाडण्यास सुरुवात केले त्यामध्ये त्यांनी आज रोजी बेकायदेशीर ऊस वाहतूक याच्यावर कारवाईतून अकरा हजार रुपये दंड वसूल केला.कागदपत्र जवळ न बाळगणे , वाहन पार्किंग मध्ये न लावणे या कलमाखाली  कारवाई केली तसेच मास्क वापरत नाहीत अशा लोकांच्यावर सुद्धा कारवाई केली. मागील पंधरा दिवसापासून म्हसवड एसटी स्टँड वर होत असलेली गर्दी व कायद्याचे पालन न करणे यांच्यावर आज कुठेतरी चाप बसलेला दिसून आला.

बागल यांच्या हजर होण्याने आता वाहतुकीस शिस्त येईल असा आशावाद अनेक म्हसवडकरांनी व्यक्त केला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *