किती पदवीधरांचे प्रश्न सोडवले,चंद्रकांत दादांनी हिशोब द्यावा -गणेश काटकर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा प्रतिनिधी ::-धनंजय माने-पाटील

 

पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणूकीचे बिगुल वाजले असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आज सातारा जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र विध्यार्थी परिषदेचे गणेश काटकर यांच्या प्रचारार्थ युवकाची बैठक झाली त्या वेळी गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात नेतृत केलेले चंद्रकांत दादा पाटील यांनी पदवीधर युवकाचे किती प्रश्न सोडविले यांची माहिती युवकांना द्यावी जर त्यांनी प्रश्न सोडवले असतील तर त्यांनी जाहीर करावे अशी टीका गणेश काटकर यांनी केली
गणेश काटकर हे पश्चिम महाराष्ट्र व मुंबई विद्यार्थी परिषदेत काम करत असून ही निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचे त्यांनी या वेळी सागितले या वेळी अनेक युवकानी आपले मनोगत व्यक्त केले.सातारा जिल्ह्यातून गणेश काटकर यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहू अशी भूमिका योगेश मोरे यांनी घेतली या पुढे माघार न घेता युवकांना दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय लोकांना धडा शिकवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आता राजकीय लोकांना त्याची जागा पश्चिम महाराष्ट्र मधील युवक या निवडणूक च्या माध्यमातून दाखवून देतील असा सूर बैठकीत सर्व युवकाचा होता.

गणेश काटकर यांना पश्चिम महाराष्ट्रातुन विषेशतः सातारा जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात युवकांचे समर्थन असल्याने कोणत्याही परिस्थितीत हि निवडणूक लढायची आणि जिंकायचीच हा निश्चय बैठकीत व्यक्त करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *