दहिवडी उपविभागात डि.वाय.एस.पी डॉ.निलेश देशमुखांचा कामाचा धडाका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील

मागील काही महिन्यापूर्वी दहिवडी उपविभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी महामुनी यांची बदली झाल्यानंतर नवीनच बदलून आलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांनी दहिवडी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून कारवायांचा धडाका चालू ठेवलेला आहे.

दहिवडी उपविभागाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी आपल्या उपविभागात मध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखा स्वतंत्रपणे चालू केली

त्यामध्ये दारू, मटका यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे तसेच फरारी आरोपी,पाहिजे असलेले आरोपी यांची पकड मोहीम सुध्दा त्यांनी हाती घेतलेली आहे तसेच म्हसवड, दहिवडी, औंध ,वडुज पोलीस स्टेशन मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन अटक करणे, गुन्ह्यांची उकल करणे, अवैध्य धंद्यावर छापेमारी असो कि सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळने असो त्यांच्या धडाकेबाज कामगीरीवर उपविभागातील जनता खुष आहे.

लोकांना अभिप्रेत असणारी कायदा सुव्यवस्था राबवण्याचा डॉ निलेश देशमुखांचा प्रयत्नांना यश येताना दिसून येत असुन, जनसामान्यांत पोलिसांच्या कामगीरीविषयी समाधान व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *