- माण-खटाव प्रतिनिधी//:- धनंजय माने-पाटील
चार महिन्यापूर्वी वडूज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. मालोजीराव देशमुख यांनी वडूज पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारल्यापासुन वडुज पोलीस स्ठेशन हद्दीत गुन्हेगारांनी तसेच अवैध्य धंदेवाल्यांनी धसका घेतलेला आहे.
संपूर्ण जगावर कोरोना कोरोनाव्हायरस या विषयाने थैमान घातलेले आहे परंतु पोलीस खाते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत आहेत असच प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत असताना अचानक 10 ऑक्टोबर 2020 रोजी वडुज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर प्राथमिक उपचार वडुज या ठिकाणी घेतले परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सातारा या ठिकाणी उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोणावर मात करून आज दि. 02नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपल्या कर्तव्यावर हजर होताना समाजसेवक तसेच नगरसेवक , पोलिस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी यांनी मोठ्या जल्लोषात फुलांचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या.
यानिमित्ताने जनमानसात पोलीसांविषयीचे प्रेमयुक्त आदरभाव पहावयास मिळाला. तसेच सहकारी स्टाफने लाईव्ह महाराष्ट्र 24 शी बोलताना आनंद आणि समाधान व्यक्त केले.












Leave a Reply