मराठा पुन्हा आक्रमक मुख्यमंत्री यांच्या मातोश्री निवासस्थानी मशाल मार्च….
अरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आज दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी मराठा क्रांती मोर्चा, मुंबईची मीटिंग झाली. या मीटिंग मध्ये उपस्थितीत झालेल्या सर्वानी आंदोलनासंबंधी सर्वानुमते काही निर्णय झाले.
आमदार, खासदार ,उपसमिती अध्यक्ष श्री अशोक चव्हाण, यांना निवेदन देऊन बैठका घेऊन काही तोडगा निघाला नाही म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी
दि. ७ नोव्हेंबर २०२०रोजी संध्याकाळी ५ वाजता मातोश्रीवर, मशाल मार्च निघेल. सदरचा मार्च हा शांततेत, व कायदा-सुव्यवस्थेचे सर्व नियम पाळून केला जाईल. या मशाल मार्चमध्ये मुंबईतील सर्व मराठा आमदारांना सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल.
मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या
१. मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा.
२. मराठा अरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
३. मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे ऍडमिशन संरक्षित केले जावेत.
या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा तसेच ठोक मोर्चा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मशाल मार्च काढणार आहे.












Leave a Reply