कलेढोणच्या दारू माफीयाला डि.वाय.एस.पी.डॉ.निलेश देशमुखांचा दणका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी: धनंजय माने-पाटील

कलेढोण (ता.खटाव) परिसरात दारू विक्रीच्या माध्यमातून आपले जाळे पसरवणाऱ्या दारू माफीयाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांनी मोठा दणका दिला. त्याच्यावर कारवाई करून विक्रीसाठी आणलेली देशी दारूची पंधरा बॉक्‍स पोलिसांनी जप्त करून त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कालिदास अरूण बुधावले (रा.कलेढोण,ता.खटाव) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल माने यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कालिदास बुधावले हा दारू विकत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र, तो पोलिसांना रंगेहात सापडत नसल्याने कायद्याच्या कचाट्यात येत नव्हता. परिणामी कलेढोण परिसरात बुधावलेची दहशत वाढली होती.

त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्यावर दबाव वाढत होता. परंतू वडूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख हे करोना बाधित असल्याने सुट्टीवर आहेत. त्यांचा चार्ज मायणी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांच्याकडे असल्याने एका अधिकाऱ्याला दैनंदिन कामे करून कारवाईसाठी वेळ देणे शक्‍य नव्हते.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी विलंब न लावता कर्मचाऱ्यांसह कलेढोण गावातील बुधावले याच्या घरी छापा टाकला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांनी त्याला खाक्‍या दाखवताच त्याने कलेढोण परिसरातील गारळेवाडीतील एका शिवारात दारूची बॉक्‍स लपवल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी गारळेवाडी येथे बुधावले याने दारू ठेवलेल्या ठिकाणी छापा टाकून 39 हजार 936 रुपये किमतीची देशी दारूची सोळा बॉक्‍स जप्त केली. त्यानंतर त्याच्यावर मायणी पोलीस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल माने, राम तांबे, तानाजी चंदनशिवे, रमेश बर्गे, अीनल वाघमोडे, सुहास गाडे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास हवालदार खांडेकर करत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *