पोलिसांचा थरारक पाठलाग, गुंगारा देण्याच्या तयारीत असणारा आरोपी गजाआड
दहिवडी प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील
वडजल ता.माण येथील काही महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तरी सदर गुन्ह्यातील आरोपी पप्पू काटकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून एक ते दोन महिने फरारी होता त्यानंतर जामिनावर बाहेर होता
तरी याच गुन्ह्याच्या कारणावरून दिनांक 24/10/2020 रोजी झालेल्या भांडणांमध्ये म्हसवड पोलीस ठाण्यात गु.र.नं.217 नुसार कलम 326,324,323,452,427,34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी फिर्यादी यास काठीने व धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले त्यानंतर सदर आरोपी हा गाव सोडून फरार झाला परंतु पोलीस हवालदार खाडे व पोलीस कॉन्स्टेबल धुमाळ यांना सदर आरोपी हा धामणी याठिकाणी असल्याबाबत माहिती मिळाली त्यावर पोलीस हवालदार खाडे व धुमाळ यांनी सदर आरोपी चा शोध चालू केला त्यामध्ये आरोपी यास पोलीस आल्याची चाहूल मिळाल्यानंतर त्याने पळून जायचा प्रयत्न केला परंतु पोलीस हवालदार नंदकुमार खाडे व नितीन धुमाळ यांनी आपला पोलीस खाक्या दाखवत त्याचा तीन ते चार किलोमीटर पाटलाग करून त्यास चोवीस तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले.
सदर कार्यवाहीबाबत पोलिसांचे नागरीकांकडून कौतुक होत आहे. तसेच पोलीस उपअधिक्षक डॉ. निलेश देशमुख आणि म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश भावीकट्टी यांनी पो.कॉ.नंदकुमार खाडे आणि पो.कॉ.नितीन धुमाळ यांचे अभिनंदन केले.












Leave a Reply