जावळी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय साळुंके यांचे दुःखद निधन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाईव्ह महाराष्ट्र 24 । सातारा । विशाल निकम

जावळी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय साळुंके यांचे दुःखद झाले. गेली चार दिवस सातारा येथे कोरोना उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक पवार यांचे ते खंदे समर्थक होते. जावळी तालुक्यातील मोरावळे या गावांमध्ये जन्मलेले स्वतःचा रिक्षा व्यवसाय करत साताऱ्यामध्ये सुरुवात केली.

त्यांनी मोरावळे गावचे पंधरा वर्ष सरपंचपद भूषवून गावामध्ये विकास सेवा सोसायटीची स्थापना करून त्याचे चेअरमन होते. त्याच बरोबर सातारा जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघ याचे सरचिटणीस होते. संपूर्ण जावळी तालुक्यामध्ये अत्यंत साधा आणि उमदा असा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती. गेली कित्येक वर्ष पवार कुटुंबियांच्या बरोबर सर्व पातळीवर उघडपणे साथ देणारे असा त्यांचा नावलौकिक होता सतत हसमुख कुणालाही न दुखवणारे असे व्यक्तिमत्व साळुंखे यांचे होते. संपूर्ण जावळी तालुक्यावर दुःखाची डोंगर कोसळला आहे. साळुंखे यांच्या निधनामुळे सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *