सातारा ते लोणंद या रस्त्यावरील वाढे, वडूथ गावाच्या हद्दीतील रस्त्याची व पुलांची तसेच वेण्णा व कृष्णा नदीवरील पुलाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे . वेण्णा व कृष्णा नदीवर असलेले हे पूल सुमारे १७५ वर्षापूर्वीचा ऐतिहासीक दगडी पूल आहेत . त्यावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे . तसेच या पुलावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत .
परिणामी या पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे . याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम उत्तम केले जावे . अन्यथा या ठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . या पुलाची अजून दुरवस्था होऊ नये म्हणून , या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी . अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावरुन अवजड वाहतूक तुर्तास बंद करण्यात यावी . यापूर्वीही वडूथ ग्रामस्थांकडून अनेक वेळा निवेदन दिले आहेत . सदर निवेदनाची योग्य ती दखल घेऊन परतीचा पाऊस जाई पर्यंत व रस्त्यांची कामे होईपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात यावी . यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यास प्रशासन व शासन सर्वस्वी जबाबदार राहील . तरी योग्य ती कार्यवाही करावी , ही विनंती
*-मदन साबळे,*
अध्यक्ष छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा,जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा (भारत)
Leave a Reply