आमचे तलाठी कुठे असतात…. माण तालुक्यातील काही गावातील जनतेचा संतप्त सवाल…..
दहिवडी: महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गावांमध्ये तलाठी यांनी आपल्या कार्यालयात वेळेनुसार हजर राहण्याचे बंधनकारक आहे परंतु माण तालुका महसूल विभागाच्या अनेक गावांमध्ये तलाठी हे पाहायलाच मिळत नाही त्यामुळे संतप्त नागरिक आमचे तलाठी कुठे आहेत असा प्रश्न विचारू लागलेत काही तलाठी यांचे मोबाईल सुद्धा बंद असतात व अनेक वेळा चुकून त्याचे फोन चालू असताना विचारणा केलीतर दहिवडी तहसीलदार कार्यालयांमध्ये असल्याचं सांगितलं जातं, दहिवडी तहसीलदार कार्यालयांमध्ये गेल्यानंतर दहिवडी तहसीलदार कार्यालय मध्ये तलाठी उपस्थित नसतात, त्यानंतर फोन केल्यानंतर त्याला त्यांचे मोबाईल बंद असतात. काही वेळानंतर आमची सुट्टी झाली आता मी घरी आलो अशा प्रकारची उत्तरे अनेक शेतकऱ्यांना दिल्याचे पाहायला मिळतात. दोन आणि तीन वाजताच काही लोक घरी जातात हे चित्र अनेक वेळा अनेक लोकांना पाहायला मिळत आहे. माण तालुका महसूल प्रशासनाचा कोणताही वचक नाही का? हा प्रश्न जनतेतून विचारला जातोय शासन नियमानुसार प्रत्येक तलाठ्याला नेमून दिलेला गावांमध्ये किमान काही वेळी कार्यालयीन वेळा मध्ये हजर राहणे हे खूप बंधनकारक आहे. परंतु तलाठी किती वेळा हजर असतात हा प्रश्न जनतेला पडला आहे? शासन निर्णयानुसार खाजगी व्यक्तीला तलाठी कार्यालयामध्ये नेमणूक करणे हा गुन्हा आहे. परंतु तरीसुद्धा माण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी यांनी खाजगी नेमणुका केलेले पाहायला मिळतात व तेच खाजगी लोक तलाठ्यांचे सर्व कामे करतात, अशा वेळी तलाठी हे कार्यालय मध्ये उपस्थित नसणे आणि खाजगी व्यक्तीने काम करणे शासन निर्णयाचे उल्लंघन नाही का? असाही प्रश्न जनतेला पडलेला आहे मुळात माण तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या तालुक्यातील जनता हातावरच्या पोटावरती आपलं जनजीवन सुरळीत करत असते, अशा वेळी मान तालुक्यामध्ये अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळतो त्यासाठी सातबाराचे उतारे त्याचबरोबर जातीचा दाखला त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अनेक गोरगरीब जनतेला तलाठी यांच्याकडे जावे लागते अशा वेळी तलाठी गावात उपलब्ध नसतात माण तालुक्याच्या शेवटच्या गावापासून दहिवडी ला येण्यासाठी आज दोनशे रुपयांचा खर्च होतो अशा वेळी हा खर्च करून दहिवडी या ठिकाणी यावे लागते तर दहिवडी याठिकाणी पण तलाठी हजार नसतील तर शेतकऱ्यांना माघारी जावे लागते आणि पुन्हा यावे लागते सातबारा उतारा साठी शेतकऱ्याला येण्या-जाण्याचा चारशे रुपये खर्च होतो आणि ते सातबारा मिळतील याची शक्यता नसते मग शेवटी मान तालुक्यामध्ये अनेक तलाठ्यांनी खाजगी व्यक्तींना तलाठी कार्यालय मध्ये ठेवले त्यांच्याकडून जादा पैसे देऊन खाजगी व्यक्ती कडून सातबारे काढावे लागतात आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते जर गावांमध्ये महसूल प्रशासनाने नेमून दिलेल्या वेळेत जर तलाठी उपस्थित राहिले तर हा प्रश्न सुटू शकतो व सर्वसामान्य जनतेची कामे पूर्ण होतील यासाठी सातारा जिल्हा महसूल प्रशासन त्याचबरोबर मान खटाव या ठिकाणी आलेले नवीन उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर दहिवडी येथील तहसिलदार यांनी माण तालुक्यातील तलाठ्यांना योग्य वेळ जर प्रत्येक गावात करून दिली आणि त्या गावात अशाप्रकारे फलक लावले तर लोकांची गैरसोय होणार नाही आणि कामकाज सुरळीत चालेल त्याचबरोबर प्रत्येक उताऱ्यासाठी किती पैसे आकारले जातात या संदर्भात ही महसूल विभागांमध्ये एक फलक लावणे खूप गरजेचे असून सामान्य लोकांना न्याय मिळेल व गोरगरीब जनतेची लूट थांबेल यासाठी महसूल प्रशासन विभाग माण तालुका यांनी सर्व तलाठी यांना त्याच्या कार्यालयात जी वेळ दिली त्या वेळेला गावांमध्ये तात्काळ हजर करावे ही मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.











Leave a Reply