निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिले बिस्किट…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिल्ली :निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले आहे. मात्र शिवसेनेची बिस्कीट या चिन्हावर नापसंती आहे.  बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल  पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतला आहे.  बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय उतरावं लागणार आहे
दरम्यान निवडणूक आयोगाला शिवसेनेने तीन पर्याय दिले होते. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली होती. पण यापैकी कोणतेच चिन्ह न मिळाल्याने शिवसेनेने निवडणूक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिले आहे.

निवडणूक आयोगाच्या उत्तराची शिवसेनेला प्रतीक्षा आहे. नितीश कुमार यांच्या  ने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतला होता.  ची निशाणी बाण आहे.

शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्य बाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपचा मुद्दा आहे.   निवडणूक आयोगाने JDU चा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही असे कळवले होते.
त्यामुळे शिवसेनेला वेगळे चिन्ह उपलब्ध करून दिले जाईल असे निवडणूक आयोगाने कळवले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले. मात्र ते चिन्हं शिवसेनेला मान्य नाही. बिहार निवडणुकीत 50 जागा लढवण्याच्या तयारीत शिवसेना आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *